maharashtra day, workers day, shivshahi news,

पर्यावरण जपणे काळाची गरज असून पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्ग संवर्धन करावे लागेल - तहसीलदार बाळासाहेब मस्के

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरुर सह्याद्री देवराईच्या वतीने वृक्षारोपण

Environment Day, Sahyadri Devrai, Tree Plantation, shirur, pue, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरुर शहरातून जाणाऱ्या पुणे -अहिल्यानगर रस्त्या लगत डोंगरावर सह्याद्री देवराई शिरुर येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के व प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाच्या शकुंतला बहेन यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के व प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शंकुतला बहेनजी , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप , प्रा. चंद्रकांत धापटे , सह्याद्री देवराई शिरुरचे महिबूब सय्यद , ॲड.आदित्य मैड , राहुल निकुंभ , बाजार समितीचे माजी सचिव दिलिप मैड, गोपीनाथ पठारे, रवि लेंडे, माजी प्राचार्य दिलिप देशमुख, अविनाश घोगरे, बाळासाहेब आवारी, माजी शिक्षक अशोक शेळके, कैलास घाडगे, फकृउद्दीन शेख, आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना शकुंतला बहेनजी म्हणाल्या की, पर्यावरणाचा बिघाड मानवानेच केला असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवालाच पुढाकार घ्यावा लागेल. पर्यावरण जपणे काळाची गरज आहे. पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्ग संवर्धन करावे लागेल. हवा, पाणी व जमिन या सर्वांवर काम करुन पर्यवारण सवंर्धन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी करावी असे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यावेळी म्हणाले. 

सह्याद्री देवराई शिरुर यांच्या वतीने हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर वड, चिंच, जांभूळ, पिंपळ, लिंब, अशी झाडे लोकसहभागातून लावण्यात आली असून या झाडांचे संवर्धन व निगा राखली जात आहे. पर्यावरणाचा होत असलेल्या ऱ्हास, बदलते हवामान या परिस्थितीत प्रत्येकांने आपआपल्या परिसरात वृक्ष लावणे व त्यांचे संवर्धन केले पाहीजे. पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अवलंब करुन पुढच्या पिढीसाठी निसर्ग जपून ठेवला पाहीजे. अश्या भावना वृक्ष प्रेमींनी यावेळी व्यक्त केल्या.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !