maharashtra day, workers day, shivshahi news,

यवतेश्वर घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प

पोलिस निरीक्षक निलेश तांबे आणि त्यांच्या स्टाफने तात्काळ प्रयत्न करुन केली वाहतूक सुरळीत

Landslide occurred at Yavateshwar Ghat, satara, havy rain, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा तालुक्यातील यवतेश्वर घाटात आज दरड कोसळल्याने  काही काळ वाहतूकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, सातारा तालुका पोलिस निरीक्षक निलेश तांबे आणि त्यांच्या स्टाफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत छोटे-मोठे दगड बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

या घाटात अजूनही दरड कोसळण्याची शक्यता असल्याने, सातारा तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पर्यटकांना व वाहनचालकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मार्गावरून प्रवास करताना सतर्कता बाळगावी असे पोलिसांनी सांगितले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !