स्थानिक गुन्हे शाखा सातारा व फलटण शहर पोलीस ठाणे यांची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
फलटण तालुक्यामध्ये ठाकूरकी येथे पंधरकी शिवारात अज्ञात व्यक्तीने संदीप रिटे, वय-36 वर्षे, रा. ठाकूरकी, ता. फलटण या युवकाला गंभीर मारहाण करून त्या युवकांचे गुप्तांग कापून खून केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच अवघ्या 36 तासात या खूनाचा छडा लावत दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. मंगेश सचिन मदने (वय-२१ वर्षे) सोमनाथ माणिक मदने, (वय-३२ वर्षे, हे दोघे रा.ठाकूरकी, ता. फलटण, जि. सातारा) या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत.
दि. १० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. पासून ते दि. ११ जून २०२५ रोजीचे सकाळी ११.३० वा.चे दरम्यान मौजे ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा येथील पंधरकी नावाच्या शिवारात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन संदीप मनोहर रिटे रा. ठाकुरबुवा मंदीराशेजारी, ठाकुरकी, ता. फलटण जि. सातारा याच्या शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचे गुप्तभाग कापुन त्याचा खून केल्याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये दि. ११ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा राजीव नवले, यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर यांनी पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड, वैभव सावंत यांचे तपास पथक तयार करुन गुन्हा उघड करण्याच्या सुचना देवून तपास फलटण शहर पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते.
सदर पथकाने फलटण येथे जावून गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देवून तेथील परिस्थितीची माहिती घेवून पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांचे समवेत तपास केला असता घटनास्थळावर मिळुन आलेला मृतदेह हा संदीप मनोहर रिटे रा. ठाकुरबुवा मंदीर शेजारी, ठाकुरकी, ता. फलटण जि. सातारा याचा असल्याची खात्री झाली तसेच तो दि. १० जून २०२५ रोजी सकाळी कामावर गेला होता तेव्हा पासुन तो परत घरी आला नसल्याची माहिती मिळुन आली. तपास पथकाने घटनास्थळावर हजर राहुन सर्वप्रथम आजुबाजुचे साक्षीदार यांच्याकडे विचारपुस करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु घडल्या प्रकारा बाबत काही एक माहिती मिळुन येत नव्हती. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करीत होते.
दि. १२ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनिय गोपनिय खबऱ्या मार्फत बातमी प्राप्त झाली की, फलटण शहरामधील मच्छी मार्केट येथे दि.१० जून २०२५ रोजी सायंकाळी मयत संदीप रिटे व अज्ञात इसमाचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्या अज्ञात इसमाने मयत संदीप याचा मोबाईल काढून घेवुन तो तेथुन निघुन गेला होता. त्याचे पाठोपाठ मयत संदीप रिटे हा देखील गेला असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोउपनि विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकाने वेशांतर करून त्यांच्या तपासाची दिशा ठरवुन तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदार यांचे जाळे तयार करून त्या अज्ञात इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. त्या इसमाकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या चुलत भावाच्या सांगण्यावरून, साडेपाच लाख रूपयांची सुपारी ठरवून संदीप रिटे याला जीवे मारल्यावर पैसे देण्याच्या अटीवर गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील व फलटण शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर खूनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत उघड केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर, पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस स्टेशन हेमंतकुमार शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, नितीन शिंदे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, मुनिर मुल्ला, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, अमित झेंडे, अमृत कर्पे, पंकज बेसके, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, रविराज वर्णेकर, प्रवीण पवार, वैभव सावंत, दलजीत जगदाळे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल बारेला, बापुराव धायगुडे, राजेंद्र नाळे, नितीन सजगणे, सचिन भोसले, चंद्रकांत धापते, जितेंद्र टिके, काकासो कर्णे, सचिन पाटोळे, गणेश अवघडे, निखील गायकवाड, अतुल बडे महिला पोलीस अंमलदार राणी फाळके, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा