संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक करणार विधी
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाजसुधारक व सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांचे महात्मा दिना निमित्त 11 मे 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता. महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पंतप्रधान आवास योजना A1008ESI ची सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा मोहननगर, आकुर्डी , पुणे येथे आयोजित केले आहे विधीकर्ते म्हणून, महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य व संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक करणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती गिरीजाबाई चंद्रकांत बनकर,विक्रम व अश्विनी बनकर आणि चि .संस्कार व उत्कर्ष विक्रम बनकर यांनी केले आहे. विक्रम बनकर यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला भटजी मुक्त करण्यासाठी अर्धांगवायु झाला असताना देखील डाव्या हाताने सार्वजनिक ग्रंथ लिहून सर्व विधींबाबत सखोल माहिती देऊन कोणत्याही विधी कार्यात विशिष्ट माणसाची गरज नाही. आणि या आधुनिक काळात विज्ञान युग असताना आपण सत्यशोधक विचार वारसा पुढे नेणे गरजेचे असून या कार्याचा आम्ही प्रारंभ करतोय या बद्दल आम्ही समाधानी आहोत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा