मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
निसर्गाच्या बदलामुळे यावर्षी पाऊस कमी झाला आणि अति पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील अनेक गावात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे पाण्याच्या टँकरची मागणी प्रशासनाकडे वाढली आहे या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक गावाने गाळयुक्त तलाव गाळमुक्त शिवार या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.
गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत नाम फाउंडेशन पंचायत समिती वाई व ग्रामपंचायत शिरगाव यांच्या सहकार्याने शिरगाव येथील तलाव येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
याप्रसंगी तहसीलदार सोनाली मेटकरी वाई पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, नाम फाउंडेशन चे समन्वय बाळासाहेब शिंदे टाटा मोटर्स सातारा समन्वयक श्रीकांत कुंभार ग्रामपंचायत सरपंच दैवता भोसले उपसरपंच रघुनाथ भोसले सदस्य नीलम भोसले माजी सरपंच धर्मू भोसले गाव कमिटी अध्यक्ष नंदकुमार भोसले राष्ट्रवादी काँग्रेस वाई तालुका उपाध्यक्ष संदीप पवार वाई पंचायत समिती माजी सदस्य मधुकर भोसले, कृषिरत्न बापू वाघ सर्व ग्रामपंचायत सदस्य तलाठी सर्कल ग्रामसेवक सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गट अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले पाणीटंचाईच्या प्रश्न प्रश्न अनेक ग्रामीण भागात होत असताना वेळे केजळ कवठे या गावांचा बोध घेऊन शिरगाव ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार ही योजना अमलात आणून तालुक्यातील इतर गावांना एक आदर्श घालून दिला आहे कार्यक्रमाचे आभार उपसरपंच रघुनाथ भोसले यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा