डिजेवर भीम गीते लावून तरुणाईचा जल्लोष
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
फुलंब्री तालुक्यातील लालवण आणि बाबरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बाबरा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा. जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल, माजी. सभापती कचरू मैंद, प्रभाकर नाना, पाशु भाई,आनंद भिवसने, राहुल भिवसने,संतोष भिवसने सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषना देण्यात आल्या, लालवण येथे प्राध्यापक मोकासे सर, व पाशु भाई, हरचंद राजपूत यांचे स्वागत माजी सरपंच उत्तम बनसोडे, बजरंग राजपूत, गोविंद बनसोडे यांनी केले . जयंती मध्ये लहान मूल, महिला जेष्ठ नागरिक, तरुण मूल,यांनी भीमगीत डीजेच्या तालावर आनंद उत्सव मिरवणुकीच्या माध्यमातून साजरा केला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा