खासदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप व किर्तीवंतां सोबत सदैव कौतुकाचा हात , या संकल्पनेतून राज्य स्तरीय कार्यरत असलेल्या कृषी व जनविकास प्रतिष्ठान च्या वतीने पारनेर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकमेव महिला पत्रकार सौ . निलम सुरेश खोसे पाटील यांना यंदाचा मानाचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ महिला पत्रकार म्हणून " पारनेर भूषण " सन्मानपूर्वक जाहीर करण्यात आला आहे .
खा.डॉ.निलेश लंके यांच्या हस्ते व राळेगण सिद्धी चे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदाशिव मापारी व संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अरुणराव आंधळे पाटील यांच्या अध्यक्षते खाली आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र दिन असलेल्या दि . १ मे रोजी सायंकाळी ४ वाजता पारनेर येथील आनंद मंगल कार्यालयात सामाजिक , पत्रकारिता , शैक्षणिक , उद्योग, कला , क्रिडा , साहित्य , अध्यात्म व बचत गटात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना २ रा " पारनेर भूषण " हा पारनेर तालुक्यातील सर्वांत मानाचा पुरस्कार सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र , शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पारनेर तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार सौ . निलम सुरेश खोसे पाटील या दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादक व दैनिक जनता आवाज च्या पारनेर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या पत्रकारितेतील लेखनीने अनेकांना न्याय मिळाला असून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे व करत राहणार आहेत. पत्रकार सौ.निलम खोसे पाटील यांच्या निवडीचे तालुक्यातून कौतूक केले जात आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा