उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचा आदेश
चैत्र शुध्द एकादशी 08 एप्रिल 2025 रोजी असून, यात्रा कालावधी दि. 02 ते 12 एप्रिल असा आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दि.07 ते 09 एप्रिल 2025 या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन उपविभागीय दंडाधिकारी श्री.इथापे यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा