maharashtra day, workers day, shivshahi news,

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत ओझर्डे येथील पतित पावन विध्यामंदिरचे यश

फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढून आनंद साजरा

Patit Pavan Vidhyamandir, Chief Minister's Maji Shala Sundar Shala competition, Ozarde, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई  (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे या विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा, उपक्रमशील शाळा. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला महाराष्ट्र शासनामार्फत विद्यालयास दोन लाख रुपयाचे बक्षीस देण्यात आले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित या विद्यालयमध्ये विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर हे विद्यालय कार्यरत असून इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवून वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर मध्ये उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे. 

गटशिक्षणाधिकारी तसेच त्यांचे इतर परीक्षक यांनी केलेल्या परीक्षणानुसार हा क्रमांक विद्यालयाला मिळाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी हे यश मिळवण्यामध्ये आपला मोलाचा वाटा दिला आहे असे उद्गार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  महेश पिसाळ  यांनी काढले. यानिमित्त आयोजित केलेल्या आनंद उत्सवामध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा प्रेरणास्थान म्हणून ट्रॅक्टर ट्रॉलीतून सजवून ओझर्डे गावात मिरवणूक काढण्यात आली 

यावेळी विद्यालयाचा झांज पथक, लेझीम पथक तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,  सेवक वर्ग यांना ग्रामस्थांनी फेटे बांधून सन्मान केला. सर्व स्टाफ ने यावेळी ग्रामदैवत पद्मावती माता मंदिर येथे विद्यार्थ्यांचे उपस्थिती दाखवून दर्शन घेतले. यावेळी आजी माजी विद्यार्थ्यांनी यांचेकडून  फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली. या यशाबद्दल. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,  सचिव प्राचार्य  शुभांगी गावडे. विद्या समिती अध्यक्ष  श्रीराम साळुंखे. संस्थेचे सीईओ  कौस्तुभ गावडे, संस्थेचे सहसचिव, विभागप्रमुख, सहाय्यक विभागप्रमुख, विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, संघटना पदाधिकारी,यांनी विद्यालयाचे कौतुक करून अभिनंदन केले. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन विकास समितीचे सर्व पदाधिकारी शिक्षक पालक संघ माता पालक संघ ग्रामस्थ, तसेच परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थांनी    विद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !