संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र तर्फे सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा पार पडली यावेळी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेनंतर मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात वाई तालुका अध्यक्षपदी सातारा न्यूज चे पत्रकार बापू वाघ यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी जेष्ठ पत्रकार सतीश सावंत, तेजस राऊत, विकास भोसले सर, महेश कुगावकर, सचिन भिलारे, संजय कदम, संतोष शिराळे, अजित सोनवणे, सचिन जाधव, गणेश बोतालजी, संदीप जठार, तसेच जिल्हा कार्यकारी पदाधिकारी तालुका पदाधिकारी व बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा कर्मवीर भाऊराव पाटील सभाग्रह या ठिकाणी करण्यात आले होते
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा