खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिवजयंती जन्मोत्सव समिती आयोजित शिव स्वराज्य रथ यात्रा सोहळा 2025 चा शुभारंभ आज पुणे येथे लाल महाल परिसरात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते झाला. त्या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार हेमंत रासणे, आमदार शंकर भाऊ जगताप, समितीचे अध्यक्ष श्री अमित दादा गायकवाड, श्री रविन्द्र कंक (सरनोबत) उपाध्यक्ष, श्री.सचिनराव पायगुडे, श्री.समीर जाधवराव, श्री.निलेश जेधे, महेशबापू ढमढेरे, श्री.प्रदीप मरळ, श्री.शंकर कडू व इतर पदाधिकारी आणि असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
लाल महाल येथे राजमाता जिजाऊ आऊसाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून व स्वराज्यासाठी त्याग केलेल्या मावळ्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या नावाने असलेल्या रथांचे गेली १३ वर्षे सलग सुरू असलेल्या या स्वराज्य रथ सोहळ्याच्या परंपरेस अनुसरून या सर्व घराण्यांचा इतिहास पुस्तक रूपी लोकांपुढे आणण्याचा उपक्रम शिवजयंती महोत्सव समितीने हाती घ्यावा व त्यास लागेल ते सहकार्य आम्ही करू. असे समितीच्या पदाधिकाऱ्यांना माननीय उदयनराजे भोसले यांनी आश्वासित केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा