maharashtra day, workers day, shivshahi news,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे स्वराज्य सप्ताहाचे आयोजन

स्वराज्य सप्ताहात' वैराट गडावर राबविले स्वच्छता मोहिम

Vairatgadh cleaning mission, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित 'स्वराज्य सप्ताह' अंतर्गत  महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे सुरू असलेल्या गडकिल्ले स्वच्छता अभियानात रविवार दि.२३ फेब्रूवारी रोजी वैराटगडावर स्वच्छता स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे  तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'स्वराज्य सप्ताह' राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या गडकिल्ले स्वच्छता अभियानात  वैराटगडावर स्वच्छता मोहिम पार पडली. 

वाई तालुका अध्यक्ष अक्षय शिंदे व तालुक्यातील गड किल्ले सेलचे कार्यकर्ते, व मित्र परिवार , गडझुंझार मावळे प्रतिष्ठान, वैराटेश्वर प्रतिष्ठान यांनी हि संयुक्त स्वच्छता मोहिम पार पाडली. वैराटगडावरील  वैराटेश्वर मंदिर परिसरासह गडावरील प्रमुख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक बॉटल्ससह एकत्र गोळा केलेला  कचरा पायथ्याला आणण्यात आला. गडावर काळाच्या ओघात मातीखाली दबलेले शिवकालीन सरदारांच्या वाड्यांचे अवशेष मोकळे करण्यात आले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !