राजेन्द्र पवार यांनी केले प्रदर्शनाचे आणि संयोजक डॉ. नितीन सावंत यांचे कौतुक
शेतकर्यांनी भविष्यातील 'एआय' तंत्रज्ञानासाठी तयार राहावे. भविष्यातील शेती 'एआय'मुळे कमी खर्चिक व अधिक उत्पन्न देणारीअसणार आहे. हे तंत्रज्ञान अजून नवे असले, तरी ते सर्वसामान्यांपर्यंत लवकरच पोहोचेल. लोणंदसारख्या छोट्या शहरात शेतकर्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याचे मोठे काम डॉ. नितीन सावंत करत आहेत.- राजेंद्र पवार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
लोणंद, येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन बारामती ॲग्रोचे राजेंद्र पवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. विक्रम कड, सुजाताताई यादव, प्रदर्शनाचे आयोजक डॉ. नितीन सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शेतकरी मेळावा झाला.
डॉ.नितीन सावंत म्हणाले, शरद कृषी महोत्सवाचे हे 6 वे वर्ष आहे. शरद पवार यांच्या प्रेरणेतून सुरू
केलेल्या या महोत्सवात प्रत्येक वर्षी शेतीतील आधुनिक प्रयोग, वेगवेगळे शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. 'कृषिक' हे शेतकऱ्यासाठी माइलस्टोन असून, कृषी महोत्सव कसा असावा आणि शेतीसाठी काय काम केले आहे, याचा प्रत्यय बारामतीच्या केव्हीकेला जाऊन,लक्ष लागले आहे.लाईव्ह डेमो बघून आल्याशिवाय येत नाही.
राजेंद्र पवार यांनी फित कापून शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन केले. नंतर डॉ. नितीन सावंत विचार मंच कडून राजेंद्र पवार यांचा सन्मान करण्यात आला. शरद कृषिरत्न पुरस्काराने चीकफीड कंपनीचे सतीश कोंडे आणि शरद कृषी उद्योजक पुरस्काराने केबी इंटरनॅशनलचे सचिन यादव यांचा राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
'कृष्णामाई' या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित यादव, के. के. गायकवाड, राजेश शिंदे, रघुनाथ शेळके, नंदकुमार मोरे, महेंद्र गाढवे, संभाजीराव शिंदे, किसन धायगुडे, स्वप्निल क्षीरसागर, शुभदा सावंत, सुजाता यादव, हेमलता निंबाळकर, शैलजा खरात, लता नरूटे व मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते गिरीश बनकर यांनी प्रास्ताविक केले. मनमोहनदास खुडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रघुनाथ शेळके यांनी आभार मानले.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा