धर्मवीर अध्यात्मिक शिवसेना प्रमुख अक्षय महाराज भोसले
शिवसेनेचे नेते खा श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय , अध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य याविषयी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे " धर्मवीर " नावाचे मुखपत्र सुरू करणार असल्याचे सांगून अक्षय महाराज भोसले म्हणाले , राज्यातील सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षण देणार , राज्यातील ६ हजार मंदिरात प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला कीर्तन सेवा , राज्यातील २४ हजार गावातील प्रत्येकी २ भजनी मंडळास भजनी साहित्य तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले . या सर्व उपक्रमांचा शुभारंभ उद्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा