१२ पास तरुणी आणि महिलासाठी नोकरीच्या संधी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पंचायत समिती मधिल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत रिक्त अंगणवाडी सेविका आणी अंगणवाडी मदतनीस पदांची सरळसेवा भरती या कार्यालया मार्फत सुरू करण्यात आली असुन त्यासाठी दि. ५ फेब्रुवारी २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत कार्यालया मार्फत देण्यात आल्याची माहिती आहे.तरी इच्छुक व गरजु उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी उज्वला गायकवाड यांनी केले आहे.
या पदासाठी इच्छुक उमेदवार हा त्या गावातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे . या साठी १८ ते ३५ वयाची अट असुन फक्त विधवा महिलांसाठी वयाची अट ४० ठेवण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवार हे १२ वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज जाहीर करण्यात आलेल्या तारखे पर्यंत पोहचतील याची काळजी घ्यावी मुदती नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असेही सुचविले आहे.
शासनाचे मार्गदर्शक सुचना नुसार उमेदवारांनी अर्जा सोबत दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन त्यांना शैक्षणिक पात्रतेसाठी कमाल ८० गुण तर विधवा व अनाथ यांच्यासाठी कमाल १० गुण आणी अनुसूचित जाती जमातीसाठी ५ गुण इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक.विशेष मागास प्रवर्ग.सामाजीक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गासाठी ३ गुण देण्यात येणार असून सेविका मदतनीस पदाचा शासकीय अंगणवाडीचा किमान २ वर्ष अनुभव असल्यास ५ गुण देण्यात येणार आहेत. ऊमेदवारांनी दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन १०० गुणांन पैकी जो उमेदवार जास्त गुण मिळवेल अशा एकाची निवड केली जाणार आहे. या बाबतची उमेदवारांना अधिक माहिती घ्यावयाची असल्यास वाई पंचायत समिती मधिल एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी किंवा संबंधित ग्रामपंचायती मध्ये संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांचे प्राप्त अर्जांची छाननी व यादी तयार करण्याचे काम दि. २० ते २७ पर्यंत करण्यात येणार आहे. गुणवत्ता समीतीची मान्यता दि .२८ ते ४ मार्च पर्यंत. प्राथमिक गुणवत्ता यादी दि. ४ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर हरकती असल्यास त्या दि. ५ मार्च ते १९ मार्च पर्यंत स्विकारल्या जातील. त्या नंतर अंतिम गुणवत्ता यादी दि. २० रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सेविका रिक्त पदांची गावे पुढीलप्रमाणे
बलकवडी अभेपुरी जांभळी वासोळे शहाबाग लोहारे आणी गोवेदिघर या गावात एक एक जागा रिक्त आहेत
मदतनीस रिक्त पदे गावे पुढील प्रमाणे
बोरीव २ जागा चिखली कुसगाव मुगाव २ जागा आकोशी जोर जांभळी ओहळी रेनावळे वासोळे कोंढावळे वाशिवली नागेवाडी वाघजाईवाडी व्याजवाडी २ जागा बालेघर गुंडेवाडी मांढरदेव वेरूळी वरखडवाडी पाचवड उडतारे २ जागा खडकी लगडवाडी भिवडी शेंदुरजणे ओझर्डे २ जागा चांदक गुळुंब अशी गावांची नावे आहेत. तरी गरजु महिलांनी या मेगा भरतीचा लाभ घ्यावा.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा