एमआडीसी मधील मालाज कंपनीला परत केली रक्कम
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
वाईच्या एमआयडीसीतील मालाज कंपनीचे दि. ६ जानेवारी २०२५ रोजी ते दि. २९ जानेवारी २०२५ रोजी दरम्यान अज्ञात इसमाने कंपनीचे ई-मेल आयडी वरती फसवा ई-मेल पाठवुन आरोपीने त्याच्या खात्यावर १,७०,००० युरो (आज रोजीचे बाजार भाव किंमत भारतीय चलना नुसार १,५३,५२,७०० रुपये) ट्रान्सफर करुन घेतले म्हणुन वाई पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुध्द संगणकीय प्रणालीचा गैरवापर करुन व फसवणुक केले बाबत गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यात आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगार अंतर्भुत असल्याने तसेच अपहार झालेली रक्कम रुपये १ कोटी ५३ लाख इतकी मोठी असल्याने पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरवुन वाई पोलीस ठाणेचे तसेच सायबर पोलीस ठाणे सातारा यांचे अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी तपासपथके तयार करुन आरोपीचा शोध घेणेकरिता व फसवणुक झालेली रक्कम परत मिळवणे करीता सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे सायबर पोलीस ठाणे व वाई पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी लंडनस्थित विदेशी बँकेला बीएनएसएस ९४ प्रमाणे नोटीस देवुन त्वरीत सायबर फ्रॉड झालेली रक्कम होल्ड करणेस सांगीतले. तसेच सदरची १ कोटी ५३ लाख रक्कम कंपनीला परत मिळवुन दिली. या गुन्हयाचा पुढील तपास परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर, व सायबर पोलिस पथक सातारा अधिक तपास करत आहेत.
पोलीस अधिक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शना खाली वाई पोलीस ठाणे परि.पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, दुय्यम अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक अमोल गवळी, वाईच्या डिबी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, महिला पो.कॉ वर्षा खोचे सायबर कॅन्सलटंट, जय गायकवाड अॅड रोहन सारडा यांच्या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा