वाहतुकीबाबत विविध अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पोलीस ठाणे हद्दीतील वाहतूकी बाबतच्या अडचणी, पार्किंग, रिक्षा स्टॉप, एकेरी मार्ग, P1-P2 Crane उपलब्धता, पोलीस ठाणे हद्दीतील होणाऱ्या चोऱ्या, विधिसंघर्ष बालक, CCTV चे प्रश्न, झोपडपट्टी, कृष्णा नदी काठी असणारे घाट प्रश्न, शहरातील शाळा कॉलेज पेट्रोलिंग, वाई पोलीस ठाणेकडील उपलब्ध मनुष्य बळ इत्यादी प्रश्नांवर मार्ग काढणेसाठी दि.१६ जानेवारी २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे वाई व्यापारी महासंघाची मिटिंग पार पडली. सदर मिटिंग करता श्रीमती संजीवनी दळवी . मुख्याधिकारी वाई नगरपरिषद वाई व वाई शहरातील ३५ ते ४० व्यापारी उपस्थित होते.
सदर मिटिंग अनुषंगाने दिनांक २२रोजी दुपारी दिड वाजता समीर शेख सातारा यांनी सर्व प्रश्नांचे अनुषंगाने समक्ष स्थळ पाहणी केली. त्यानंतर श्रीमती संजीवनी दळवी मुख्याधिकारी वाई नगरपरिषद वाई यांचे उपस्थितीत वाई नगरपरिषद येथे बैठक घेऊन वरील सदर प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या सीसीटीव्ही तसेच इतर उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. मिटींग नंतर वाई शहरातील वाई व्यापारी संघाचे पदाधिकारी-सदस्य, वाहतूक चालक-मालक संघटना पदाधिकारी-सदस्य तसेच वाई शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून समीर शेख यांचा सत्कार केला.
सदर स्थळ पाहणी व बैठकीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग . बाळासाहेब भालचिम, श्याम पानेगांवकर परि. पोलीस उपअधिक्षक प्रभारी अधिकारी वाई पोलीस ठाणे, जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई, वाहतुक विभागाचे पो. कॉ. रुपेश जाधव, पो. कॉ. रामदास कोळेकर, पो.कॉ. गोरख दाभाडे, गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार पो. कॉ. प्रसाद दुदूस्कर, पो. कॉ. धिरज नेवसे, वाई व्यापारी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच वाहतूक चालक-मालक संघटना पदाधिकारी तसेच वाई शहरातील व्यापारी मिळून ६० ते ७० नागरिकांनी सहभाग घेतला होता.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा