पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पंढरपूर शहर पोलीसांची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारा वाळु तस्कर टोळीतील सराईत गुन्हेगार १) ग्यानबा दिपक धोत्रे, रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर (टोळी प्रमुख), २) गणेश यलाप्पा बंदपटटे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ३) किरण माणिक धोत्रे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ४) बाळासाहेब अंकुश पवार रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) यांचेविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके यांनी २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे वरील प्रस्तावित हददपार इसमांवर प्रस्ताव तयार करून हददपारीचे कारवाईबाबत अहवाल सादर केला होता.
डॉ.अर्जुन भोसले साो उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग, पंढरपुर यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो सोलापुर ग्रामीण यांचेकडे सादर केला होता त्या अनुशंगाने हददपार कामकाज चालवुन सदर टोळी प्रमुख व सदस्यांना मा. पोलीस अधिक्षक साो श्री. अतुल कुलकर्णी साो यांनी संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन ५० दिवस कालावधीकरीता हददपार करण्यात आले असून हददपार इसम नामे १) ग्यानबा दिपक धोत्रे, रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर (टोळी प्रमुख), २) गणेश यलाप्पा बंदपटटे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ३) किरण माणिक धोत्रे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) ४) बाळासाहेब अंकुश पवार रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) यांना ताब्यात घेवून सदर हददपार आदेश बजावण्यात आलेला आहे.
यापुढेही पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील दोन पेक्षा जास्त दाखल गुन्हयातील वाळु तस्करांवर हदपार करणेसंदर्भातील कामकाज सुरू आहे.सदरची कामगीरी ही, श्री. अतुल कुलकर्णी साो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, श्री. प्रितमकुमार यावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, श्री. डॉ. अर्जुन भोसले साो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर व श्री. विश्वजीत घोडके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, श्रे. पोसई राजेश गोसावी, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोहवा प्रसाद औटी, पोकॉ दिगंबर भंडरवाड, पोकॉ अनिस शेख यांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा