maharashtra day, workers day, shivshahi news,

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात - कारचा अक्षरशः चुराडा

अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

Man kid in car accident, Samruddhi mahamarg, express way, sindkhedraja, Buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)

समृद्धी महामार्गावर आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०७:०० वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्ग चानैज क्रमांक 336.8 मुंबई कॉरिडोर वर एक भीषण अपघात झाला. अपघात एवढा जोराचा होता की यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला. रस्त्यावर कारचे अलग अलग पार्ट विखुरली गेले. 

सकाळी कार क्रमांकMP-28-CB-9530 चा चालक श्रवण मेलानी वय २० वर्ष राहणार नागपूर, हे आपल्या मित्रासोबत नागपूर वरून संभाजीनगर कडे जात असताना कारचालकाला झोपेची डुलकी लागल्याने कार अनियंत्रित होऊन समोर जात असलेला ट्रक क्रमांकMH-12-UM-3433 चे चालक वैभव रावसाहेब व्यवहारे वय 28 वर्षे रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा पुणे हे हळुवारपणे इमर्जन्सी लेनवर आपले वाहन चालवत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चालकाला झोपेमुळे समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने पाठीमागून उजव्या साईडच्या टायर जवळ कार धडकली व कार पुन्हा मिडीयम मधील बॅरियर ला धडकून यामध्ये ड्रायव्हरच्या बाजूला समोर बसलेले कार मधील सुजोग सोनी वय 20 वर्ष रा. नागपूर हा जागेवरच मरण पावला. व सोबत असलेले आयुष जैन वय २० वर्ष रा नागपूर हा गंभीर जखमी झाला. व चालक किरकोळ जखमी झाला. त्यांना तात्काळ समृद्धी महामार्ग 108 ॲम्बुलन्स चे डॉक्टर वैभव बोराडे ,डॉक्टर यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे, व शैलेश दळवी यांनी जागेवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे घेऊन गेले. 

तसेच,समृद्धी महामार्गQRV टीमचे कैलास आघाव, श्रीकृष्ण बच्छीरे, इंगोले ,गोपाले, कराळे ,अभिषेक काणेकर व पवार या सर्वांनी अथक प्रयत्न करून मृतक व जखमी यांना वाहनाच्या बाहेर काढले. तसेच काही काळ अपघात ग्रस्त कार चे पार्ट वाहना महामार्गावर अस्तव्यस्त झाल्याने महामार्ग पोलीस चे पीएसआय शैलेश पवार ,पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर राठोड व निवृत्ती सानप यांनी महाराष्ट्र सुरक्षा बल चे भगवान गायकवाड, राठोड ,जोशी ,यांच्या मदतीने वाहतूक नियंत्रित करून अपघात ग्रस्त कार पोस्टे सिंदखेडराजा येथे रवाना केले व वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

महामार्ग पोलीस मलकापूरचे प्रभारी अधिकारी संदीप इंगळे यांनी सर्व वाहनधारकांना आवाहन करीत आहे की महामार्गावर चालताना सर्व नियमाचे पालन करून व पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावी व अपघात टाळता येईल.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !