ओझर्डे गावावर शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील महावितरणचे निवृत्त प्रधान-तंत्रज्ञ अशोक रघुनाथ फरांदे यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवडे, असा परिवार आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा