उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केली कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या अकरा वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियांची दादागिरी रोखण्यासाठी वाळू संबंधात गुन्हे करणाऱ्या ११ जणांचा प्रस्ताव तयार केला होता.
अनिल लक्ष्मण पवार (रा. गुरसाळे ता.पंढरपूर), कृष्णकांत दत्तात्रय पळसे (रा. तपकिरी, शेटफळ, ता. पंढरपूर), सचिन चांगदेव काटे (रा.शेगाव दुमाला, ता. पंढरपूर), सुधीर ऊर्फ बापू संभाजी कांबळे (रा.चळे, ता. पंढरपूर), पंकज रामदास घाडगे (रा. चळे ता. पंढरपूर),
सुनील नाथ देठे (रा.लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर), रवी ऊर्फ सूरज शंकर आटकळे (रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर), विक्रम हनुमंत चोंडे (रा.आंबे ता.पंढरपूर), सागर प्रकाश साळुंखे (रा.आंबे ता.पंढरपूर), सचिन तुकाराम भोई (रा. सरकोली ता.पंढरपूर), मारुती दगड्डू बोंबाळे (रा. गोपाळपूर ता. पंढरपूर) असे एकूण ११ जणांचे महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे दोन वर्ष हद्दपारीचेचे प्रस्ताव प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी मंजूर केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे यांनी केली आहे.
हद्दपार केलेल्या पैकी सहा आरोपींना सांगली, तीन आरोपींना कोल्हापूर, एकाला पुणे ग्रामीण, तर एकास सातारा जिल्ह्यात संबंधित पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा