maharashtra day, workers day, shivshahi news,

सिंदखेड राजा मतदारसंघात महायुतीत बेबनाव - घड्याळ आणि धनुष्यबाण एकाच वेळी मैदानात

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात तब्बल ३७ उमेदवारांनी भरले अर्ज

election, mahavikas aaghadi, mahayuti, sindkhed raja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)

मतदारसंघात  निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी ३७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यात सामना होणार असे वाटले होते, परंतू शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म सह अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या घटक पक्षात मैत्री पुर्ण लढत होते की काय ? की एकाला थांबावे लागले हे चार नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आमदार तथा माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी महायुतीतून महाविकास आघाडीत प्रवेश केला त्यांना  उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीचा धर्म पाळत अर्ज दाखल करताना काँग्रेस शिवसेना उबाठा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर हजर होते

राजेंद्रशिंगणे यांच्यामुळे घाटावरील चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ मिळाले असा सुर बहुतेक नेत्यांनी आवळला कारणही तसेच आहे, या चारही मतदारसंघांत डॉ राजेंद्र शिंगणे यांचे कार्यकर्ते आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांची उमेदवारी शेवटच्या दिवशी जाहीर झाली त्यांचा अर्ज दाखल करताना महायुतीचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येतील अशी अपेक्षा होती परंतू वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांना जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांनी ए बी फॉर्म दिल्याने त्यांनी आपला उमेदवारीअर्ज भरला

भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कायंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुतीत काय चाललंय अशी चर्चा जनमानसात सुरू आहे. महायुतीचे घटक पक्ष जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत निवडणूकीची दिशा कळणार नाही. बहुजन वंचित आघाडीच्या नेत्या सविता मुंढे यांनी आपला अर्जही दाखल केला आहे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटनीस अंकूर देशपांडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली आहे.

 विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी  विजय प्रतापराव घोंगे, प्रकाश भिकाजी गिते, नामदेव दगडू राठोड, गायत्री गणेश शिंगणे, प्रशांत दिलीप पाटील, अशोक श्रीराम पडघान, सुरेश एकनाथ घुमटकर, सय्यद मुबीन सय्यद नईम, रामदास मानसिंग कहाळे, डॉ मनोर खा रशीद खाँ पठाण, कुरेशी जुनेद रौफ शेख, अभय चव्हाण, दिलीप ब्रम्हाजी खरात, राजेंद्र मधूकर शिंगणे दत्तात्रय दगडू काकडे स्वतंत्र भारत पक्ष सुनील पंतिंगराव जाधव, शेख रफीक शेख शफी, मनसब खान पठाण, दत्तु रामभाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर कैलास म्हस्के, प्रल्हाद रंगनाथ सोरमारे, बाबासाहेब बन्सी म्हस्के सुधाकर बबन काळे, भागवत देवीदास राठोड, अलका रामप्रसाद जायभाये,

शिवानंद नारायण भानुसे, अ. रफीक अ अजीज, शिवाजी बाबुराव मुंढे, विजय पंढरीनाथ गवई, सुरज धर्मराज हनुमते यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !