maharashtra day, workers day, shivshahi news,

दुर्गम भागातील जनतेचे देखील आपण देणे लागतो - काँग्रेस नेते विराज शिंदे यांचे प्रतिपादन

मध्यरात्री नदीतून धोकादायक प्रवास करत महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागाचा केला दौरा

Congress leader Viraj Shinde, MLA Makarand Patil, mahabaleshwar, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात पोहोचण्याची हिंमत कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पक्षाचे नेते करीत नाहीत. परंतु या भागातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे नेते विराज भैय्या शिंदे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नुकतेच त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी व सोळशी खोऱ्यातील अतिदुर्गम भागाचा दौरा करुन नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्याच्या काळात त्यांनी मध्यरात्री नावेतून प्रवास करुन नदीच्या पलिकडे वाट पाहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. 

या भागाचे आमदार मकरंद पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षांच्या काळात या भागात एकदाही गावात पाऊल टाकले नाही अशी तक्रार या गावच्या नागरिकांनी यावेळी केली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक मुलभूत पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहिलेला असून विकासाच्या नावावर केवळ रस्त्याची किरकोळ-किरकोळ कामे झाली आहेत. रस्त्यांची दोन-तीन महिन्यांतच दुर्दशा झाली मात्र त्याचे श्रेय घेणारे फलक मात्र आजही आमची थट्टा करीत उभे आहेत अशी व्यथा या भागातील नागरिकांनी विराज शिंदे यांच्याकडे मांडली. 

यासंदर्भात बोलताना विराज शिंदे म्हणाले, की “महाबळेश्वर भागातील मतदान खंडाळा आणि वाई या दोन विभागांच्या तुलनेत कमी आहे. राजकीय गणितांचा  विचार केला तर वाई आणि खंडाळ्याच्या मतांवर कोणताही आमदार निवडून येत असतो. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याचा दौरा करण्याच्या फंदात कोणताही नेता पडत नाही. परंतु ज्या भागात आपण काम करतो. त्या भागातील प्रत्येक गावातील नागरिकाशी आपले सेंद्रीय नाते असते. हे नाते विसरुन जमणार नाही. हा त्या प्रत्येक गावाशी आणि नागरिकाशी अक्षरशः द्रोह आहे. ही जनता आपली मायबाप आहे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची जबाबदारी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. ही भूमिका आणि जाणीव ठेवून या भागाचा दौरा करीत असून येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत आहे.” 

दरम्यान, या दौऱ्यात विराज शिंदे यांनी सिंधी,मोरनी, महालुंगे, आरव, पुनर्वसन मोरणे,वळवण, चकदेव,सालोशी, लामज, निवळी,आकल्पे, रामेघर तसेच कांदाटी व सोळशी खोऱ्यातील सर्व गावांचा दौरा केला आहे .या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी काही गावांमध्ये नागरीकांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांच्यासोबत शशिकांत भातोशे, भूषण मोरे, सतीश चव्हाण, प्रकाश चव्हाण, हरीश निवळे, कृष्णा जाधव, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व  स्थानिक ग्रामस्थ  उपस्थित होते.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !