उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य रोजगार उद्योग आणि इतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनाला मुंबई यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी नामदार मंगल प्रभात लोढा कौशल्य रोजगार उद्योग व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
संविधान मंदिराची उद्घाटन उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने होणार आहे या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव नांदेड जिल्हा येथे कार्यक्रमाची व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक 12 13 14 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अनुक्रमे चित्रकला स्पर्धा या भारताची संविधान या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान वादविवाद स्पर्धा निबंध स्पर्धा इत्यादी पद्धती आयोजन करण्यात आले आहे.
जेणेकरून नागरिकांमध्ये विशेषता उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागृती वाढवणे घटनात्मक समस्या दुरुस्त्या समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयातील जागरूकता वाढविण्यासाठी त्याचे अधिकार समजून घेण्यास किंवा त्यांचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी निबंध स्पर्धा व सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे संविधानाच्या विविध पैलवान पुस्तके लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याचा सदरील कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे सदरील कार्यक्रम व संविधान मंदिराच्या उद्घाटनासाठी प्राचार्य अन्नपूर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत कार्यक्रमाची नियोजन आकर्षक व चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी प्राचार्य, पी के अन्नपूर्णे , यांच्या मार्गदर्शनाखाली गट निदेशक श्री एस एल तोडकर, शिल्प निर्देशक बी एस जगताप, ए वाय शेख, श्रीमती एस बी मिटके, एम बी निंबाळकर, कार्यालयीन कर्मचारी बनसोडे मॅडम बावगे मॅडम यांनी परिश्रम घेत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा