maharashtra day, workers day, shivshahi news,

मांजरमच्या महादेव मंदीरातील दानपेटी चोरी प्रकरणातील चोरांना पोलीसानी पकडले

तीन आरोपीना अटक - मुद्देमाल जप्त - आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Donation box stolen from temple, thieves caught by police, majaram, naigao, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर) 

मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटी चोरीकरणाऱ्या चोरांना नायगाव पोलिसांनी  गुप्त माहितीच्या आधाराने  मोठ्या शिताफीने तात्काळ चोरांना पकडले असून यातील तीन आरोपीना अटक करून मुद्देमाल जप्त करीत  शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता  मांजरम गावातीलच  तिन्हीआरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे 

दिनांक ०९ सप्टेंबर च्या रात्री ०९.०० ते १० सप्सटेंबर च्या पहाटे ०५.०० वाजताचे दरम्यान मौजे मांजरम येथील शेषेराव व्यंकटराव मंगनाळे यांचे शेतातील महादेव मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोटयांनी फोडुन त्यातील अंदाजे ३०,०००/- रुपये रक्क्म चोरुन नेले अशी तक्रार सुभाष हावगीरराव मंगनाळे वय ५८ वर्षे रा.मांजरम ता. नायगाव यांनी दिली. तक्रारीवरुन पोलीस स्टेशन नायगाव येथे गु.र.न.२२८/२०२४ कलम ३०५ भा.न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास श्री अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नायगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रकाश अमृता पंडीत हे करीत होते.

दि.१२/०९/२०२४ रोजी तपास पथकातील पोउपनि प्रकाश पंडीत व पोका / ३१२ बालाजी शिंदे यांना गुप्त् बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरलेले आरोपी मांजरम येथील असुन सध्या मांजरम येथे असल्याची माहीती मिळाली. सदर बाबत वरीष्ठांना माहीती देवून मांजरम येथुन आरोपी १. बाजीराव गोविंदराव शिंदे वय ३२ वर्षे रा. मांजरम यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार २. गोविंद विठल शिंदे वय ३६ बर्षे रा. मांजरम ता. नायगाव ३. शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे सह मिळुन केल्याचे कबुल केले 

मांजरम येधुन आरोपी २) गोविंद विठल शिंदे बय ३६ वर्षे ३) शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे दोघे रा. मांजरम ता. नायगाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्याने गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर तीन आरोपीचे ताब्यातुन १२६० रुपये किंमतीचे चांदीचे दागीने व १४०९० /- रुपये रोख रक्क्म असा एकुण १५,३५०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हयात जप्त करण्यात आले आहे. 

सदर आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना एम. सी. आर. केले आहे.सदरची कामगीरी  अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड,  खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी देगलूर यांचे मार्गदर्शनाखाली  अजित कुंभार, पोलीस निरीक्षक,  प्रकाश पंडीत, पोलीस उप निरीक्षक,  भिमराव कदम, पोलीस उप निरीक्षक पोहेको ११३३ गणपत पेदे, पोहेकों/ ९४१ बाबूराव चरकुलवार,  पोकों/३१२ बालाजी शिंदे, पोकों/ ८४२बालाजी बामणे यांचे पथकाने केली आहे.सर्व पथकांची मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !