भारतीय जनता पार्टी नगर पारनेर विधान सभा प्रभारी बिपिन शिक्का यांचे कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर, नगर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नगर पारनेर विधान सभा प्रभारी बिपिन शिक्का यांनी पारनेर येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे होते. यावेळी यावेळी पारनेर तालुका मंडळ प्रभारी शुभांगी सप्रे, विश्वनाथ कोरडे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे ,पारनेर तालुका भाजपचे सरचिटणीस दिनेश बाबर , ज्येष्ठ नेते बडवे काका, पारनेर शहर भाजपचे अध्यक्ष ऋषिकेश गंधाडे, नगरसेवक युवराज पठारे , अशोक चेडे , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज कारखिले , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर मैड, पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संग्राम पावडे ,मधुकर पठारे ,सुनील पवार युवा नेते तुषार पवार, अमौल मैड,आनंद गांधी,किरण कोकाटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी बोलताना बिपिन शिक्का म्हणाले की ,पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ योजना, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प,तसेच केंद्र शासनाच्याही योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करुन भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबुत करावे.यासाठी बुध प्रमुख सुपर वॉरियर्स यांनीही बुथ मजबुत केले पाहिजे . भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत पारनेर विधानसभेचे उमेदवारी भारतीय जनता पार्टीलाच मिळावी, अशी मागणी यावेळी बिपिन शिक्का यांच्यासमोर केली आहे.
भाजपाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अतुल माने , जिल्हा कार्यकारिणी सदस्य किसनराव शिंदे , बाबासाहेब येवले व इतर कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार उमा खापरे यांच्या निधीतून पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विश्वनाथ कोरडे यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे मार्गी मागल्या ने पारनेर नगर विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढली असून आगामी निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा निश्चित फायदा होणार असल्याने ही जागा पक्षालाच मिळावी , जेणेकरून भाजपाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करून विजयश्री खेचून आणू असा विश्वास ही निरीक्षक बिपिन शिक्का यांच्या समोर व्यक्त केला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा