maharashtra day, workers day, shivshahi news,

बैलपोळ्यापूर्वी सहकार शिरोमणी कारखाना प्रलंबित सर्व देणी देणार - चेअरमन कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी कारखान्याच्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न

sahakar shiromani vasantrao kale sugar factory, bhalavai, pandharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगाम २०२३-२४ मधील अंशतः प्रलंबित ऊस बीले, यंदाच्या हंगाम २०२४-२५ साठी ऊस तोडणी वाहतूकीपोटी पहिला आडव्हान्स बैल पोळ्यापूर्वी देण्यात येईल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले.

कारखान्याच्या गळीत २०२४-२५ च्या २६ व्या गळीत हंगामासाठी कारखान्यातील देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असून त्यातंर्गत मिल रोलरचे पुजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत सोपान कोळेकर यांचे शुभहस्ते आणि चेअरमन मा.श्री.कल्याणराव वसंतराव काळे व संचालक मंडळाचे प्रमुख उपस्थितीत यांच्या संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कल्याणराव काळेसाहेब पुढे म्हणाले, कारखाना व्यवस्थापनाने मागील गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतूक केलेल्या वाहन मालकांना ३४ टक्केप्रमाणे होणारी  कमिशनची रक्कम आणि डिपॉझिट रक्कम यापूर्वीच दिलेली आहे. यंदाच्या हंगामात संचालक मंडळाने  ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. त्याची संपुर्ण तयारी झालेलीअसून येणाऱ्या गळीत हंगामात दैनंदिन गाळप क्षमतेएवढा ऊस उपलब्ध होण्यासाठी २०० ट्रॉक्टर, २५० बैलगाड्या व १५० बज्याट गाड्यांचे करार केलेले आहेत. काही बैलगाड्या व बज्याटना पहिला हप्ता देण्यात आला असून उर्वरित वाहनांना पहिला हप्ता आणि गत गळीत हंगामातील शेवटच्या टप्प्यात राहिलेली ऊस बीले बैल पोळ्यापूर्वी देण्यात येतील.  कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस सहकार शिरोमणी कारखान्यासच गळीतासाठी द्यावा, असे आवाहनही श्री कल्याणराव काळे साहेब यांनी केले.

प्रारंभी कारखान्याचे संस्थापक स्व.वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे व श्री विठ्ठल रुक्मिणीचे पुजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, आण्णा शिंदे, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, युवराज दगडे, परमेश्वर लामकाने, सुनिल पाटील, अमोल माने, अरुण नलवडे, सुरेश देठे, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, टेक्निकल जनरल मॅनेजर पी.टी.तुपे, चिफ केमिस्ट् व्ही.एल.सावंत, शेती अधिकारी पी.आर.थोरात, डेप्यु.चिफ इंजिनिअर अे.डी.पांढरे, चिफ अकैंटंट बबन सोनवले, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, सभासद शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !