प्रा. डॉ .बलभीम वाघमारे यांचे व्याख्यान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
येथील शरदचंद्र कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरीबाबु व उपप्राचार्य डॉ. श्याम पाटील हे होते तर प्रमुख वक्ता म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. बलभीम वाघमारे हे होते. यांनी आपल्या मनोगतात दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून नितिवान व चारित्र्यसंपन्न नायक उभे केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी महत्त्वाचे योगदान दिले व तसेच लोकमान्य टिळकांनी आपल्या चर्तुसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरिबाबु यांनी केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे विभाग प्रमुख डॉ. बी.आर. लोकलवर यांनी केले. सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.गो.रा. परडे यांनी केले. तर आभार हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.एस.पी. वट्टमवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा