maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न

जागतिक छायाचित्रकार दिवस उत्साहात साजरा

World Photographers Day, Photo World Awards Ceremony, pandharpur, solapur, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्त साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते कैमेरा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अकलूजचे प्रसिद्ध छायाचित्रकार सिने अभिनेते धनंजय जामदार व सोलापूरचे प्रसिद्ध फोटोग्राफर शिवाजी धुते यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.


हा पुरस्कार आय एम ए पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर शितल शहा व पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर यांच्या शुभहस्ते व वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सुनील उंबरे,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पंढरपूर अध्यक्ष डॉ.मंदार सोनवणे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलीपे, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौगुले, या प्रमुख मान्यवरांच्या  उपस्थितीत देण्यात आला.


सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्ह्यातून व परिसरातून मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचचे श्रीकांत लव्हेकर, विनायक देवकर,पांडुरंग तरळगट्टी, आनंद गदगे, राजेश अंबीके,जितेंद्र शहा,सतीश चव्हाण, राहुल गोडसे,पांडुरंग कुलकर्णी, ओंकार आराध्ये, अलीसागर तांबोळी, किशोर काकडे, नागेश साळुंखे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चंद्रराव तर प्रास्ताविक विकास मंचचे बशीर शेख यांनी केले तर आभार जैक गायकवाड यांनी मानले.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !