आनेवाडी टोल नाक्यावर केले टोल बंदी आंदोलन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने बरोबर दहा वाजता टोल बंदी आंदोलन करण्यात आले पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत तसेच रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक अपघात होत आहेत तरीदेखील महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करून टोल वसुली करत आहेत. जर रस्ता चांगला नसेल तर टोल का द्यायचा आणि टोल नाक्याची मुदत संपूनही टोल वसुली का केली जाते स्थानिकांना टोल माफ केले जात नाहीत रस्त्यावर अनेक प्रकारच्या सुविधांची कमी आहे म्हणूनच आज आ.पृथ्वीराज चव्हाण, सतेज बंटी पाटील विश्वजीत कदम याच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश जाधव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजीतसिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने विराज शिंदे जयदीप शिंदे, प्रताप पिसाळ तसेच काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा व क्रीडा विभाग समिता गोरे सातारा जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष अल्पना प्रताप यादव सेवादल अध्यक्षा मालन परळकर सातारा शहराध्यक्ष रजिया शेख सातारा शहर चिटणीस असावरी शिंदे वाई तालुका महिला अध्यक्ष धनश्री मालुसरे तसेच कार्यकर्ते काशिनाथ पिसाळ अजिंक्य शिंदे मोहन बर्गे राजेंद्र शेलार बाबासाहेब कदम जगन्नाथ कुंभार बाबुराव शिंदे विलास पिसाळ नरेश देसाई यांनी टोल वसुली बंद करून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे टोल न घेता गाड्या सोडायला सुरुवात केली.
डॉक्टर सुरेश जाधव म्हणाले, राज्य सरकार सामान्यांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. राज्यात महागाई वाढलेली असताना पायाभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पुणे- बेंगलोर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेंद्रे ते कागल हा रस्ता अद्याप सहा पदरीकरणाच्या निमित्ताने पूर्ण झालेला नाही. रिलायन्स इन्फ्रा या कंपनीकडून या कामांमध्ये वारंवार टोलवाटोलवी केली जात आहे मग असे असताना सातारकरांना सक्तीचा टोल का भरावा लागत आहे याचा कुठेतरी जाब विचारलाच पाहिजे म्हणून काँग्रेसचे आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भर पावसामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली. राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक प्रकाश गवळी यांच्या संघटनेने सुद्धा टोल नाक्यावर आंदोलन करत वाहतूकदारांना जर सुविधा मिळत नसेल तर टोल का भरायचा असा प्रश्न केला. एका दिवसात टोल नाक्याच्या संदर्भात तीन संघटनांचे वेगवेगळ्या आंदोलन झाल्याने खरोखरच टोल वसुली ही चर्चेत आली आहे. पोलीस प्रशासनाने आनेवाडी टोल नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा