आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांचा जाहीर निषेध
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूरीचा शासन आदेश दि.२४ जुलै रोजी निघाला. यामध्ये पेनूर, शेटफळ, अनगर व नरखेड अशी चार मंडलातून ४३ गावे अनगर अप्पर तहसील कार्यालयाला जोडल्याने या चार मंडलातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.शासनाने जर हा निर्णय माघारी नाही घेतला तर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
अनगर वगळता बाकी तीन मंडळांना अनगर हे अतिशय गैरसोयीचे होत असून सर्वसामान्य लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने विद्यमान आमदार यशवंत माने व राजन पाटील यांनी अतिशय कुटील डाव रचला असून फक्त हम करे सो कायदा या अनुषंगाने इतर मंडळातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार चालविला जात आहे.पेनूर मंडळातील जनतेला मोहोळ फक्त १६ किमी असताना जास्तीचे १५ किमी अंतर अनगरला का जायचे...? बाकीच्या लोकांनी लाचारी करावी म्हणून...?आज आजी व माजी आमदारांना पेनूर भागातील जनतेने मते दिली आहेत त्या दोघांना पण जरा लाजा वाटल्या पाहिजेत.राजन पाटलांच्या पुरोगामी विचारांचा हाच का तालुका...? स्वतःचे घर भरण्याचे हेच का त्यांचे पुरोगामी विचार...? अशा घणाघाती शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी अप्पर तहसील अनगरला पळविल्याबद्दल टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला मोहोळ जवळ आहे की अनगर ...? मोहोळ तालुक्यातील जनतेने तुम्हाला शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी निवडून दिलेले नाही,किती लाचारी करणार आहात आमदार यशवंत माने..?पेनूर परिसरातील नेते मंडळीना माझे आवाहन आहे की, लाळघोटेपणा बंद करा, गाव उध्वस्त करण्याची सुपारी तुम्ही घेतलेली आहे.पेनूरच्या जनतेने घ्यावे की भविष्यात तुम्हाला अनगरच्या दारात जाऊन मालक-मालक करावे लागणार आहे.तसेच अनगरवरून राजकारण खेळणाऱ्या गावपुढाऱ्यांनी थोडी फार काहीतरी वाटली पाहिजे.पेनूर मंडलातील पेनूर, पाटकुल, तांबोळे, पोखरापूर, खवणी, कोन्हेरी, सारोळे, पापरी या गावातील जनता तुम्हाला जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टीका सोलापूर जिल्ह शिवसेना जिल्हाप्रमुख,नियोजन समिती सदस्य , ग्रामपंचायत सदस्य चरणराज चवरे यांनी पत्रकारांना बोलताना केले.
राजन पाटील व यशवंत माने यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहेआम्ही रस्त्यावर झोपू, आम्ही जीवाची परवा न करता कोणत्याही थराला जाऊ पण आमच्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांची मुजोरगिरी तालुक्यात चालू देणार नाही यासाठी गाव व तालुक्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तहसील कार्यालय काढायचे होते तर कुरुल कामती भागात काढले असते तर तेथील जनता तर किमान खुश झाली असती.मोहोळ तालुक्यावर अजून किती दिवस अन्याय करणार? येत्या निवडणुकीत आमदार यशवंत माने व राजन पाटील यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. पेनुर पाटकुल तांबोळे पोखरापूर खवणी कोन्हेरी सारोळे पापरी ह्या सर्व गावातील लोकांनी अनगर ला जायचे तहसीलच्या कामासाठी, ह्या गोष्टीसाठी आमचा जाहीर निषेध आहे आणि हे कदापि शक्य होणार नाही आमचा जीव गेला तरी बेहत्तरचरणराज चवरेशिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा