बळसोंड परिसरात पाण्याची भिषण टंचाई
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - बळसोंड परिसरात कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना नसल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी आदर्श कॉलेज जवळील पालिकेच्या जल कुंभावरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.
बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नगरात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना स्वतःच्या बोरवेल वर अवलंबून राहावे लागते. यंदा पावसाळा अधिक होऊनही पाणी पातळी खालावल्याने बहुतांश नागरिकांच्या घरातील बोरवेल फेब्रुवारी महिन्यात कोरडे ठाक पडल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, बळसोंड ग्रामपंचायत साठी जलजीवन पेयजल योजना मंजूर झाली असून, त्या योजनेची कामे सुरू असून किमान आणखी नागरिकांना पाणी मिळण्यासाठी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे. आणखी योजना पूर्ण झाली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी आतुरता लागली आहे. एक वर्षाचा वेळ दिला असता तो वेळ ही निघून गेल्याने कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतने ठीक ठिकाणी सिंटेक्स टाक्या उभारून पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच टॅंकर ही मंजूर झाले होते. यंदा दोन टँकरची मागणी केली असून अद्यापही एकही टँकर उपलब्ध झाले नाही .बहुतांश नागरिकांना विकतच्या टँकर वर तहान भागविण्याची वेळ आली आहे .
तत्कालीन ग्रामपंचायतने मारलेल्या बोरची बकाल अवस्था झाली असून सर्व बोरवेल कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतने नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान नागरिकांना खाजगी टँकरवर तहान भागविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा