सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने भगवान श्री परशूराम जन्मोत्सव
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथे सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने भगवान श्री परशूराम जन्मोत्सव निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यावरून आज भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने भगवान श्री परशूराम जयंती निमित्ताने भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार १० मे रोजी परशूराम जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.
याच जयंती निमित्ताने आज १६ मे गुरूवार रोजी सायंकाळी ४ वाजता हिंगोली शहरातील मंगळवारा भागामधील श्री दत्त मंदिरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. ही शोभायात्रा मंगळवारा बाजार रस्त्यावरून देवगल्ली, मारवाडी गल्ली, कपडा गल्ली, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोष्ट ऑफीस रस्त्यावरून रेल्वे स्टेशन मार्गावरील गायत्री भवनमध्ये विसर्जीत होणार आहे. या ठिकाणी भव्य महाआरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. आजच्या शोभायात्रेत सकल ब्राह्मण समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल ब्राह्मण समाज अंतर्गत परशूराम ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा