सोयाबीनच्या वाणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली परिसरात यंदा पेरणी योग्य पाऊस लवकरच होणार असल्याचे संकेत राज्याच्या हवामान विभागाने दिल्यानंतर खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करणाऱ्या महाबीजकडून शिबिरांचे आयोजन करून विविध बियाण्यांच्या वाणासंदर्भात माहिती देण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात महाबीजचे व्यवस्थापक सर्जेराव चव्हाण यांच्यासह कृषी क्षेत्र अधिकारी विनोद घुले प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गावात व बांधावर जाऊन हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या पेरणी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन बियाणांच्या वाणाबद्दल सखोल विश्लेषण व माहिती देत आहेत. यामध्ये महाबीजकडून देण्यात येणाऱ्या महाजैविक व ट्रायकोडर्मा आणि फुले संगम या सोयाबीनच्या वाणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा