जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात बाराच्या सुमारास कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील मार्च एन्ड संपला तर काही कर्मचारी निवडणुकीच्या नावावर गायब होण्याचे प्रकार वाढल्याने सोमवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात बाराच्या सुमारास कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागात ३१ मार्च म्हणजे मार्च एण्डची धावपळ असते , मागील वर्षीच्या निधीचे कुठे खर्च तर चालू वर्षातील निधीचे नियोजन यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात अधिकारी, कर्मचारी कामकाज करीत होते. तर सोमवारी मार्च एण्ड ची कामे संपताच समाजकल्याण, विभागासह इतर विभागात निवणुकीच्या नावावर कर्मचारी गायब झाल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात शुकशुकाट दिसून आला. बांधकाम विभागात मार्च अखेर गुत्तेदारांची देयके प्रलंबित असल्याने रविवार पर्यन्त बांधकाम विभागात गर्दी दिसून येत होती, तर मार्च संपताच गर्दी ओसरल्याचे चित्र होते. काही विभागात चक्क अधिकारी, कर्मचारी निवडणुकीचा कामात असल्याने कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा