एसटी महामंडळाचे देयक पाहूनच अधिकारी चक्रावले
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली जिल्हा प्रशासनाने मोठा गाजावाजा करून तसेच पत्रकार परिषद घेऊन अधिकारी यांच्या बैठकावर बैठका घेऊन आम्ही तत्पर असल्याचे दाखवून देत जिल्हा नियोजन समितीतून २.३५ कोटी द्यावे लागणार आहेत. अद्याप एकही यंत्रणेकडून देयके आले नसले तरी हा खर्च २.५० कोटी पेक्षा अधिक झाला आहे. वास्तविक पाहता जिल्ह्याचे वार्षिक अंदाजपत्रक २३५ कोटीचे असताना एक टक्का म्हणजेच २.३५ लाख रुपये कार्यक्रमावर खर्च होणे अपेक्षित होते. एसटी महामंडळाने ३०० बसेसचे ५९.५८ लाखाचे देयक पाठविल्याने अधिकारी चक्रावून गेले आहेत.
येथे १० मार्च रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. प्रशासकीय कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमात राजकीय रूपरेषा देण्यात आली,जिल्हा प्रशासनाच्या दहा लाखा पेक्षा अधिक रकमेच्या खर्चासाठी ई निविदा राबविणे आवश्यक आहे. शामियाने ,डोम , भोजन आदींचे वेगवेगळे देयक १० लाखा पेक्षा अधिक रकमेचे आहे. मात्र या कार्यक्रमासाठी ई निविदा राबविली नसल्याचे सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा