मंजुर रस्त्याचे काम होत नसल्याने गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आदमपूर: नांदेड-देगलूर राज्य महामार्गालगत दिड किलोमीटर अंतरावर बिलोली तालुक्यातील केरूर हे एक छोटसं गाव आहे. मुख्य रस्त्यावरून गावात जाणारा दीड किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाने या गावाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नवीन एक किलोमीटरचा रस्ता मंजूर केले. परंतू सदर रस्ताचे काम सुरू होत नसल्याने गावकऱ्यांनी थेट उपोषण करण्याचा इशारा दिला आहे
बिलोली तालुक्यातील केरूर गावाला जोडणारा दिड किलोमीटर डांबरीकरण जोड रस्ता आहे हा डांबरीकरण दोन रस्त अनेक वर्षापासून खराब झाला असल्याने येथील गावकऱ्यांनी शासन दरबारी तक्रार निवेदने उपोषणे करून नवीन रस्ता मंजूर करून घेतला आहे. एकूण रस्त्यांपैकी १ किमीचा डांबरीकरणचा जोड रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मागील वर्षी मे महिन्यात डांबरीकरण जोड रस्ता मंजूर झाला. मंजूर होऊन तब्बल १० महिन्याचा कालावधी होत आला आहे. तरीही शासनाकडून सदर दैन्य अवस्था असलेल्या रस्त्यावर डांबरीकरणचे काम अद्यापही सुरू केले नसल्याने सदर डांबरीकर रस्ता फारच खराब झाला आहे, रस्त्यात खड्डेच-खड्डे पडले आहेत. व गिट्टी देखील उकडून पडली आहे.
सदर रस्त्यावर साधी मोटर सायकल चालवणे कठीण जात आहे. या रस्त्यावरून ये -जा करताना गावकऱ्यांच्या बरेच गाड्यांचे छोटे-छोटे अपघात देखील होत आहेत. शासनाने येत्या ५ एप्रिल पर्यंत काम चालू करणेसाठी जातीने लक्ष घालून काम चालू करावे काम सुरु न झाल्यास आम्ही व गावकरी आपल्या कार्यालयासमोर ८ एप्रिल पासुन साखळी उपोषण करणार आहोत तरी या साखळी उपोषणाची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील. असे मजकूर टाकत येथील महिला सरपंच दैवशीला कुरणापल्ले, माजी सरपंच हजारे दिगांबर,तरटे धम्मपाल आदिने निवेदनावर स्वाक्षऱ्या करीत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नांदेड यांना दिले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा