नगर परिषदेचे मुख्याधीकारी अरविंद मुंडे यांनी केली पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर महाराष्ट्र आता येथे शुशोभिकरणाची कामे केली जाणार असुन सध्या या भागात रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची पाहणी शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधीकारी अरविंद मुंडे यांनी केली.
जलेश्वर तलाव परिसरात झालेले अतिक्रमण नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आले. आता जलेश्वर परिसरात शुशोभिकरणाची कामे केली जाणार आहेत. सद्या नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहाणी नगरपरिषद चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केली. दरम्यान याठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेत पुन्हा लोखंडी पोल लावलेले दिसले ते पोल त्वरित पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. व संबंधित लेआउट धारकाला नोटीस देण्याचे आदेश दिले. तसेच येथे लावलेले लोखंडी पोल जप्त केले. यावेळी नगर अभियंता रत्नाकर, अभियंता वसंत पुतळे, बाळू बांगर, माधव सुकटे आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा