राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले भूमिपूजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत मोकळ्या जागेतील श्री खंडोबा मंदिर परिसरात, खासदार हेमंत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये निधीतून सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन राजश्रीताई हेमंत पाटील, शिवसेना शहर प्रमुख अशोकराव नाईक, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई देवकते, सरपंच शैलेश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रतापराव काळे, ग्रामसेवक केंद्रे, डॉक्टर अनिल निर्मले, प्राध्यापिका अंजलीताई निर्मले, डॉक्टर रवी थोरात, गणेश बोरकर, लक्ष्मण काळे, सरस्वतीबाई काळे, ग्रामपंचायत सदस्य बांगर, प्रल्हाद सोळंके, सुमित घिके, कुंडलिक रवणे महाराज, पत्रकार गोपाळराव सरनाईक, चंद्रकांत कावरखे, प्रभाकर कावरखे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी विकास कामे होत आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक व धार्मिक ठिकाणी सभागृह निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे ग्रामपंचायत करून मागणी केली जात आहे. यादरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्याकडे बळसोड येथील नागरिकांनी, ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोकळ्या जागेतील खंडोबा मंदिर परिसरात सभामंडळ बांधकाम करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये देत, सभामंडप बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले असून लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा