गुन्हे शाखेने केले सोन्या चांदीचे दागिने जप्त
शहरातील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेतील दहा कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चार फेब्रुवारी रविवारी दुपारी कुलस्वामिनी ज्वेलर्स या दुकानाची तपासणी केली दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने जप्त केली आहेत. हिंगोली शहरातील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेतील दहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेनै युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोनाजी आमले उपनिरीक्षक रामराव पोटे अशोक कांबळे जमादार विकास सोनवणे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने प्रकरणातील मुख्य आरोपी समजले जाणारे कैलास खजुले व बजरंग खर्जुले यांना अटक केलीआहे.
याशिवाय पतसंस्थेचे अधिकारी ताब्यात घेतली आहे या प्रकरणांमध्ये पोलिसांनी बजरंग खर्जुले यांना सोबत यास सोबत घेऊन रविवारी दुपारी सराफा मार्केट मधील कुलस्वामिनी ज्वेलर्स या दुकानाची तपासणी करून दुकानांमधील सर्व लोकर व कपाट पंचनामा करून उघडण्यात आले लॉकरमध्ये सोन्या चांदीचे दागिने सापडले यामध्ये चांदीचे पैंजण लहान मुलांचे वाळे कडे यांच्यासह सोन्याचे काही तयार दागिने आढळून आले आहेत पोलिसांनी सदरील दागिने जप्त करून त्याचे मोजमाप करण्याची तयारी चालू आहे या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आणखी काही आरोपीच्या शोधासाठी पदके रवाना केली आहेत मात्र अटके मधील आरोपींनी अर्बन पसंतीतील ठेवी कुठे गुंतवल्या त्यातील किती रुपये खर्च केले त्याची माहिती आतपायी दिली नाही त्यामुळे पोलिसांनी आता त्याचे इतर बँकेत असलेल्या त्याची माहिती घेऊन सदर बँकेत खाते सील करण्याची तयारी चालवली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा