जिल्ह्यात शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र बुलढाणा द्वारा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हात १००% मतदान यशस्वीपणे पार व्हावे यासाठी कसून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलडाणा जिल्हातील प्रत्येक तालुक्यात मतदान जागृती अभियानाला जोरदार सुरुवात झाली आहे.
आज मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील स्वराज प्रशिक्षण केंद्र साखरखेर्डा येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार जागृती अभियानाला ग्रामस्वच्छता व जागृक मतदाता चा पुरस्कार करणारे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून जनजागृती अभियान वर्गाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्यामदे सर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी जीवन फाउंडेशन चे प्रशिक्षण प्रमुख श्रीमान खडसे साहेब तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रचार समितीचे व्याख्याते शुभम शेवाने प्रामुख्याने उपस्थित होते,
त्यांनी सशक्त लोकशाही च्या बळकटीकरणासाठी व मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान जागृती किती अतिआवश्यक आहे हे नवमतदार तथा उपस्थित मतदारांना बोधकथेच्या माध्यमातून तसेच आपल्या भारदार आवाजातील शाहिरीच्या अंदाजात सांगताच टाळ्यांचा एकच कडकडात ऐकायला मिळाला. या नंतर उपस्थित मतदारांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली मतदार जागृती अभियानाचे प्रास्तविक नेहरू युवा केंद्राचे सिंदखेडराजा तालुका समन्वयक विनायक खरात तर आभार प्रदर्शन स्वराज प्रशिक्षण केंद्राचे संचालक मंगेश राजगुरू यांनी केले
कार्यक्रमात महिला-पुरुषांसह नवमतदारांचा प्रतिसाद लक्षणीय होता. मतदार जागृती अभियानाच्या यशस्वीते साठी अक्षयसिंग दभैये,सागर गवई,महेश खराडे,अर्चना काळे यांच्यासह स्वराज युथ कल्ब साखरखेर्डाच्या सदस्यांनी प्रामाणिक मेहनत घेतल्याचे दिसून आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा