maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीमुळे पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

धनुर्विद्या स्पर्धेत पंढरीची प्रांजल पाटोळे राज्यात प्रथम
Pandhari's Pranjal Patole first in the state in archery competition , Students of Zilla Parishad School ,  pandharpur , shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगावची विद्यार्थिनी प्रांजल ग्रुरूप्रसाद पाटोळे हीची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथील इयत्ता 3 री तील विद्यार्थिनी कु.प्रांजल गुरुप्रसाद पाटोळे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत तिने नऊ वर्ष खालील मुलींच्या इंडीयन प्रकारात यश मिळवले आहे. दोन सुवर्णपदक तीन रौप्य पदक अशी एकूण पदकांचे पंचक पूर्ण केले. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
प्रांजल ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथील शिक्षक गुरुप्रसाद पाटोळे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक  बुधवंतराव सर, सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख स्वाती डोंगरे, पंढरपूर पंचायत समितीचेचे गटशिक्षण अधिकारी मारुती लिगाडे यांनी अभिनंदन केले. लहान वयात मोठी कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. ती AJ आर्चरी अकॅडमी पंढरपूर येथे सराव करत असून तिला धनुर्विद्या राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.सागर सुर्वे, श्री. विठ्ल माळी, श्री.अजित वसेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !