मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला शिबीराचा लाभ...
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संकल्पनेतून जन सामान्यांपर्यंत शासनाच्या जनकल्याणकारी योजना आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ता.२८ रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्राथमिक केंद्राअंतर्गत परिसरातील ५१० रूग्णाची मोफत तपासणी शिबीरामध्ये करण्यात आली.
यामध्ये डोळ्यांची तपासणी, एन सी डी तपासणी, उच्च रक्तदाब, शुगर मधुमेह तपासणी, शिकलसेल तपासणी, स्त्री रुग्ण तपासणी, संशयित कर्करोग तपासणी करून विविध आजारांवरील रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले.तसेच यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य गोल्डन कार्ड काढणे व वाटप करणे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी,व आदी आरोग्याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ उर्मिला पवार, बालरोग तज्ञ डॉ विशाल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर रोडगे, सोमनाथ हटे्कर मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष,शुभम कदम, सरपंच आसिफ खान पठाण उपसरपंच ज्ञानेश्वर किर्तनकार, सपोनि अरुण नागरे,शोभा शिंदे, डॉ संगीता टारफे, डॉ अलिया समरीन,सुवर्णा अकमार, पल्लवी भाले,वर्षा पवार,हरिहर गायकवाड, वैजनाथ लोकडे, मनोज बांगर, राहुल इंगोले, प्रकाश बर्वे, भालेराव, गायकवाड,शिरामे,आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा