राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली : येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १४ फेब्रुवारी २०२४ रोजी आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सेठ श्री घनश्यामदासजी काबरा यांच्या स्मरणार्थ ४ थ्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन 'जातीय जनगणना देशाच्या एकात्मतेला तारक/ मारक आहे' या विषयावर आयोजित करण्यात आली तरी
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कमलकिशोरजी काबरा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली विधानसभेचे विद्यमान लोकप्रिय आमदार मा. श्री तानाजीराव मुटकुळे, मा. श्री रामदास पाटील सुमठाणकर, (माजी मुख्याधिकारी, नगरपालिका हिंगोली तथा हिंगोली लोकसभा प्रभारी), आदर्श शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य मा. श्री रमेशचंद्रजी चांडक, मा. श्री सदाशिवआप्पा सराफ, मा. श्री विष्णूनारायजी काबरा, मा . श्री शिवप्रसादजी काबरा, मा. श्री रमेशचंद्रजी मुंदडा, मा. श्री विजयकुमार काबरा, मा. अमृतलालजी वर्मा, मा. श्री किशोरजी सोनी, तसेच सदरील राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मा. श्री कैलाशभाऊ काबरा, माजी नगराध्यक्ष मा. श्री बाबारावजी बांगर, मा. फुलाजीमामा शिंदे ( भाजप जिल्हाध्यक्ष), माजी नगरसेवक मा. हमीद भाई प्यारेवाले, मा . श्री मधुसूदनजी काबरा, मा. श्री रमनसेठ काबरा,श्री रजनीश पुरोहित, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विलास आघाव, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून व स्व. सेठ श्री घनश्यामदासजी काबरा यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शूभहस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रा. धनंजय जोशी व संच यांच्या स्वागत गीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य प्रो. डॉ. विलास आघाव यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री रामदास पाटील सुमठाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी पारितोषिकाची अपेक्षा न करता विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपला व्यक्तीमत्व विकास घडवावा असे विचार व्यक्त केले. तसेच या प्रसंगी हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री तानाजीराव मुटकुळे यांनी ही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. मा. अध्यक्ष श्री कमलकिशोरजी काबरा यांच्या वतीने अध्यक्षीय मनोगत मा. श्री विजयभाऊ काबरा यांनी मांडले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, पर्यवेक्षक प्रा. अनिल शास्त्री, एमसीव्हीसी समन्वयक डॉ. संजय कयाल, अधीक्षक श्री दिलीप दुबे, स्टाफ सचिव प्रा. डॉ. अण्णाजी मडावी, स्टाफ सहसचिव प्रा. अरविंद गाडे, स्नेहसंमेलन प्रभारी प्रा. डॉ. तुकाराम हापगुंडे, स्नेहसंमेलन सहप्रभारी प्रा. राम तोडकर, श्री कैलाश डिडाळे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातुन आलेले स्पर्धक संघ व त्यांचे संघ व्यवस्थापक, स्पर्धेचे तज्ञ परिक्षक वाघमारे महाविद्यालय, बाळापूर येथील प्रा. डॉ. माधव जाधव, तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव, येथील प्रा. डॉ. दत्ता सावंत, कमलाताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी येथील प्रा. डॉ. आशा गीरी यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. आशीष गट्टानी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. राम तोडकर यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा