गटविकास अधिकाऱ्यांनी दिले सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
फुलंब्री पंचायत समिती समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड अशोक जाधव दिनांक 12 तारखेपासून आमरण उपोषणला बसले होते. गरिबांना घरकुल, गाय गोठे, रोजगार हमी, सिंचन विहीर, तात्काळ मंजूर कराव्या व वर्क ऑर्डर देण्यात याव्या या मागण्यासाठी कॉम्रेड अशोक जाधव व इतर पदाधिकारी उपोषणकर्ते व लाभार्थी उपोषण करत होते. दिनांक 14 तारखेला सायंकाळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गायकवाड साहेब यांनी कॉम्रेड अशोक जाधव यांना शरबत देऊन उपोषण थांबवण्यात आले.
त्यांच्या विविध मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले आहे. उपोषणकर्ते कॉम्रेड अशोक जाधव,कॉम्रेड काकाजी तायडे, गदर गायकवाड, अर्जुन जाधव, कारभारी शेळके, ज्ञानेश्वर बनसोड पांडुरंग शेळके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका सदस्य कॉम्रेड इंदुमती केवट, मालनबाई फलके, इंदुबाई चिकटे, कारभारी वाटोळे, कारभारी शेळके, गंगाधर गायकवाड, आदी लाभार्थी आणि कार्यकर्ते उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा