maharashtra day, workers day, shivshahi news,

अवैध गौण खनिज रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकावर रेती माफीयांचा जीवघेणा हल्ला

जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरयांचा आदेश

Anti-illegal sand mining and traffic prevention team in the district , Hingoli , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली) दि.२४: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकातील तलाठी व  कोतवालावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या घटनेत कळमनुरी तालुक्यातील कोंडूर सज्जाचे तलाठी जगदीश कुलकर्णी व कोतवाल राजेंद्र बाभुळकर हे जखमी झाले. 
दोघेही गस्तीवर होते. त्यावेळी चिंचोर्डी येथे रात्री १०:३० वाजेच्या सुमारास विना क्रमांकाचे रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर कोंडूर येथून चिंचोर्डीकडे येताना दिसले. तलाठ्याने ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पुढे निघून गेले. ट्रँक्टरचा पाठलाग करत तलाठी व कोतवालाने ट्रॅक्टर चिचोर्डी येथे पकडले. 
त्यानंतर चालकाने ट्रॅक्टर मालक ज्ञानेश्वर पतंगे व त्याच्यासोबत इतर दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यावेळी तलाठ्याने रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, ती भरली नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून रॉयल्टी भरण्याबाबत तलाठी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले असता, ज्ञानेश्वर पतंगे व ट्रॅक्टर चालकाने शिवीगाळ करून मोबाईल हिसकावून घेत मारहाण करत ट्रॅक्टर खाली घालून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर  ट्रॅक्टरमधील रेती घटनास्थळी टाकून ट्रॅक्टर घेऊन गेले. या घटनेत तलाठी व कोतवाल हे गंभीर जखमी झाल्यामुळे गस्तीवर असलेल्या महसूल विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले व जखमी तलाठी व कोतवालास‌ सामान्य रुग्णालय कळमनुरी येथे दाखल करण्यात आले.
या‌ घटनेचे कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 307,353,379,327,504,506,34 व महाराष्ट्र जमीन महसूल संहीता 1966 चे कलम 48(7) व 48 (8) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
या‌ घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, शाखा कळमनुरी यांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना सोमवारपर्यंत अटक करण्याबाबत निवेदन सादर केले आहे. अटक न झाल्यास गौण खनिज कार्यवाहीवर बहिष्कार टाकून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !