१ मार्च पासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात
शिवशाही वृत्तसेवा पुणे, (जिल्हा प्रतिनिधी- अभिषेक जाधव)
पुणे दि २९:- पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली आहे. राज्यात उद्या १ मार्च पासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात होत आहे.
यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे.
परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. आज माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा