बरबडा परिसरात खळबळ - आरोपीला घटनास्थळी आणुन चौकशी तनावपूर्ण शांतता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवाशी असणारे जमीलखान शादूलखान पठाण वय 33 वर्षे हा दोन नोव्हेंबर 2023 रोजी रात्री घराबाहेर मोटार सायकल घेऊन गेला असता तेव्हा पासुन परत आला नाही. अशी तक्रार त्याच्या घरच्यांनी पोलिस स्टेशन कुंटूर येथे दिली. त्यानंतर तेथील पोलिस यंत्रनेला कसलाही सुगावा लागला नाही त्यात त्यांना अपयश आले असे म्हणत पोलिस कसलीही हालचाल करत नसल्याचा रोष व्यक्त करत पठाण यांच्या घरच्यांनी एस.पि.कडे धाव घेतली त्यानंतर ती केस एल. सी. बी. कडे वर्ग करण्यात आली. त्यावर एल.. सी. बी. ने काही सुगावा लागतो का? यासाठी प्रयत्न करत असताना तेवढ्यात माळेगाव यात्रेनिमित्त सर्व यंत्रणा व्यस्थ होती.
त्यातच गावातील मच्छीमार बांधवांना नदीमध्ये काही मासाचे तुकडे आढळून आले हि माहिती अजिस पठाण यांना मिळताच पठाण यांनी पोलिस स्टेशन कुंटुंर चे सपाेनि विशाल बाहात्तरे, पाे.हे . काॅ.लक्ष्मण साेनकांबळे,पाे .हे. काॅ.भार्गव एलसीबीचे सपाेनि साेनुवले व बिट जमादार ठाकुर यांना माहिती दिली हाच धागा पकडून प्रयतनाची पराकाष्ठा करत गोदावरी नदीच्या पात्रात शोध मोहिम सुरु केली अखेर त्यांना यश आले
त्यामधून कुंटूर पोलिसांनी अगोदर नावासहित अर्ज दिला असल्यामुळे गुरुवारी संशयीत म्हणून चक्रधर दिगांबर शिंदे, माधव परसराम राठोड, गोविंद शंकर रेडेवाड, पवन प्रभाकर माचनवाड, प्रथमेश प्रकाश पांपटवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी या मोहिमेसाठी फॉरेन्सिक इन्व्हिटेशन तसेच जिवरक्षक यांना पाचारण करण्यात आले होते. त्या सर्वांना पोलिस खाक्या दाखवताच आरोपीनी हा खून केली असल्याची कबुली दिली. त्यानंतरच शुक्रवारी उशीरा रात्री सात च्या दरम्यान त्या पाच हि जनावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यात त्यांना भारतीय दंड संहिता 1860 नुसार 302, 201, 120-B, 143 इत्यादी कलमे लावण्यात आले आहे. हि सर्व प्रक्रिया होईपर्यंत संध्याकाळ झाली त्यामुळे रात्री थंडीमध्ये नदीत शोध घेणे शक्य नसल्याने प्रेत काढण्यासाठी शनिवारी अकरा वाजता शोध मोहिम सुरवात केली. त्यावेळी आरोपीला घटनास्थळी आणुन त्याची चौकशी करण्यात आली मग त्यानंतर त्या नदीमधून गाडीसह प्रेत बाहेर काढण्यात आले. त्याचा पंचनामा करून प्रेताचे पीएम डाॅ . वैभव गाजलवाड यांनी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. चार वाजता मजीद बरबडा येथे त्यांचा अतिशय दुःखी अांतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आला .
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली हानपुडे पाटील, सपोनि रामतीर्थ चे संकेत दिघे, सपोनि कुंटूर चे विशाल बाहात्तरे , पोलिस हेडकॉनस्टेबल बरबडा बिट चे लक्ष्मण सोनकांबळे, पोलिस हेडकॉनस्टेबल भार्गव सुवर्णंकार, पोलिस नाईक माधव पल्लेवाड, पोलिस पाटिल प्रतिनिधी कानगुले, पोलिस शिपाई खंडू मुंडफळे इत्यादी मेहनत घेऊन शोध मोहिम यशस्वी केली. या घटनेचा पुढील तपास सपोनि कुस्मे व एलसीबीचे पाेलिस अधिक्षक खंडेराय, सपाेनि साेनुवले, बीट जमादार ठाकुर हे करीत आहेत.
मृताचे नातेवाईक यांनी सर्व आरोपीवर कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे हे मुख्य सर्व आरोपी म्हणुन लावण्यात यावे अशी मागणी केली असे होत असेल तरच पोस्टमॉटम करू दिल्या जाईल नसता नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तसा शब्द दिल्यानंतर त्या मृताचे पोस्टमॉटम करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा