पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण

वास्तूचे नुतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले
Inauguration of Government Rest House , Guardian Minister Abdul Sattar , Hingoli , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली , दि.26 : येथील ऐतिहासिक शासकीय विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्यात आले असून या विश्रामगृहाचे लोकार्पण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आज करण्यात आले. 
या ऐतिहासिक शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण प्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे उपस्थित होते. 
हिंगोली येथील ऐतिहासिक वारसा असलेले शासकीय विश्रामगृह इमारत यप 1874 पासून अस्तित्वात आहे. या इमारतीचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्यामुळे या वास्तूचे नुतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले आहे. नुतनीकरण करताना अस्तित्वातील इमारतीमधील सागवान दरवाजे व दरवाज्याची चौकट इत्यादी गोष्टीचा पुनर्वापर करुन नवीन फर्निचर तयार करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये सर्व कामे दर्जेदार करण्यात आली आहेत. या इमारतीमध्ये एकूण चार अतिमहत्वाचे कक्ष तयार करण्यात आले असून हे कक्ष मंत्री महोदय व आमदारांना राखीव असणार आहेत. आजपासून हे ऐतिहासिक शासकीय विश्रामगृह हेरिटेज 1874  नावाने ओळखला जाणार आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !