लाखोंचे कुटार जळून खाक
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
लोणार आज ३० जानेवारीला लोणार शहरात अग्नितांडव पाहायला मिळाला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास वर्धमान गोरक्षण गोडाऊनला आग लागली, हळूहळू आग रौद्र रूपात येताच परिसरात अनेकांची तारांबळ उडाली. कित्येकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आग इतकी भीषण होती की, काही केल्यास आग आटोक्यात येत नव्हती. शेवटी लाखोंचे कुटार आगीत जळून खाक झाले.
घटनास्थळी परिसरातील तरुणांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तरुणांनी गोदामाच्या आत जाऊन टीन पत्रे खुली केली. त्यामध्ये कुशल संचेती, बोरा सुंदर संचेती ,तुषार संचेती, देवांग संचेती, हर्ष रूनवाल,तानाजी मापारी, सुशील डोंगरवार, गोपी, विशाल वर्मा, रंजीत बेहरा, कैलास मादनकर, अक्षय मोरे, आश्विन दीक्षित, अरबाज खान ,संतोष मिसाळ, तसेच अग्निशमन दलाचे विकास मोरे ,प्रभाकर सानप ,राजेश्वर राऊत, यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश मापारी, नगरपरिषदेचे भूषण मापारी, डॉक्टर संतोष संचेती, सानप यांनी भेट दिली. तर मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप तलाठी अशोक सोदर, सचिन शेवाळे, लोणार पोलीस स्टेशनचे विशाल धोंडगे, संतोष चव्हाण अनिल शिंदे, गजानन डोईफोडे, यांनी घटनेचा सविस्तर पंचनामा केला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा